Maharashtra

अभिनेता अक्षय कुमार याच्या घरात जबरदस्ती घुसणाऱ्या जबरा फॅनला अटक

By PCB Author

February 07, 2019

मुंबई, दि. ७ (पीसीबी) –  बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या घराचा पत्ता गुगलवर शोधून, घरामध्ये जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका २२ वर्षीय जबरा फॅनला अटक करण्यात आली आहे.

अंकित गोस्वामी (रा. हरियाणा) असे अटक करण्यात आलेल्या या फॅनचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित गोस्वामी हा अक्षय कुमारचा चाहता आहे. केवळ त्याला भेटण्यासाठी तो हरियाणाहून मुंबईला आला होता. त्याने गुगलच्या मदतीने अक्षय कुमारचा पत्ता शोधला. त्यानंतर सोमवारी (दि.५ फेब्रुवारी) मध्यरात्री दीडच्या सुमारास तो अक्षय कुमारच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र यावेळी सुरक्षारक्षकाने अंकितला पाहिले आणि पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. “जुहू पोलिसांनी त्याची चौकशी करुन मंगळवारी अटक केली. त्याच्यावर परवानगीशिवाय घरात घुसल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे,” अशी माहिती पोलिस उपायुक्त परमजीत सिंह दहिया यांनी दिली आहे.