Desh

अभिनंदन यांनी भारतात येताच ‘ही’ व्यक्त केली भावना

By PCB Author

March 02, 2019

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे शुक्रवारी रात्री ९.२० मिनिटांनी वाघा बॉर्डरवर आगमन झाले. भारतात येताच त्यांनी  ‘आता छान वाटत आहे’, अशी भावना व्यक्त केली आहे.  तसेच भारतात प्रवेश केल्यानंतर अभिनंदन यांच्या चेहऱ्यावर   आनंद आणि देशाबद्दल असणारा अभिमान  स्पष्टपणे  दिसून येत होता.

भारतात आल्यानंतर अभिनंदन यांना अमृतसर विमानतळावरून दिल्लीला आणण्यात आल्यानंतर त्यांना आर आर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  भारतीय लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी करणार आहेत.

दरम्यान, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अभिनंदन यांना सीमारेषा पार करण्यासाआधी व्हिडीओ रेकॉर्ड करायला लावल्यानेच त्यांना उशीर  झाला.  हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर पाकिस्तानने  रात्री ९ वाजता मीडियासाठी रिलीजही केला. या व्हिडीओत अभिनंद आपण टार्गेट शोधण्यासाठी नियंत्रण रेषा पार केली होती, मात्र आपले लढाऊ विमान कोसळले असे सांगत आहेत.