‘अब से हम ७ मे’ म्हणत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अडकली विवाहबंधनात; मराठी अभिनेत्रीच लॉकडाऊन लग्न

0
701

दुबई, दि.१९ (पीसीबी) : लग्न म्हणजे जन्मभराचे ऋणानुबंध…प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. ७ मे रोजी दुबईत सोनालीचा विवाह सोहळा पार पडला. सोनालीने तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. सोनालीने कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली. दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला.

‘दोन दिवसांत सगळं ठरवलं. एका तासात खरेदी आणि १५ मिनिटांमध्ये चार लोकांच्या साक्षीने मंदिरात (इथे कोव्हिड निर्बंधांमुळे तेवढंच शक्य आहे) वरमाळा, मंगळसूत्र, कुंकू केवळ या ३ गोष्टी करून (लग्नाच्या मान्यतेसाठी मंदिराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विधी) मॅरेज सर्टिफिकेटवर स्वाक्षरी केली’ अशी पोस्ट सोनालीने लग्नाचे फोटो शेअर करताना लिहिली. सोनालीच्या संसार आणि माहेरच्या परिवाराने या सोहळ्याला ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली. सोनालीवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोनाली आणि कुणालच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दुबईतच सोनाली आणि कुणालचा साखरपुडा पार पडला होता.