अब की बार २२० पार ‘त्या’ बोलण्याच्या गोष्टी झाल्या – बाळासाहेब थोरात

377

मुंबई, दि, १८ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर युती आघाडीत एकमेंकावर तासेरे ओढणे चालू आहे. भाजपा प्रदेशाध्या चंद्रकांत पाटीय यांनी माध्यमाशी बोलताना दावा केला की, येत्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजीनामे देऊ भाजपात प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, अस काही होणार नसून कॉंग्रेस आघाडी विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहेत.

चंद्रकांत पाटील सोलापूर येथे बोलताना म्हणाले की, – राष्ट्रवादीचे आमदार माझ्या संपर्कात आहेत. लवकरच येत्या आठवड्या राजीनामे त्यांना योग्य वेळ आली की भाजपात प्रवेश दिला जाणार आहे. तत्पूर्वी असे इच्छुक आमदार आपले राजीनामे सादर करतील, नंतर त्यांना भाजपात घेतले जाईल. राजीनामे सादर करणाऱ्या आमदारांची नावे लवकरच पुढे येतील, असेही ते म्हणाले.

 

यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ह्या सगळ्या बोलण्याची गोष्टी झाल्या. असे काही होणार नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटलांचा दावा खोडून काढला आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले की, कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा एक ही आमदार राजीनामा देणार नाही. तसेच कोणीही पक्ष सोडून जाणार नाही. चंद्रकांत दादा अब की बार २२० पार असा दावा करत असले तरी त्या बोलण्याच्या गोष्टी झाल्या. वास्तवात अस होणार नाही, असे थोरात म्हणाले.