Desh

अबब! भारतात सापडलेली भगवान शंकराची ‘ती’ मूर्ती २८ सहस्र ४५० वर्षे प्राचीन

By PCB Author

July 28, 2021

नवी दिल्ली, दि.२८ (पीसीबी) : भारतात ‘कल्प विग्रह’ या नावाने ओळखली जाणारी भगवान शंकराची धातूची मूर्ती आतापर्यंत जगात सापडलेल्या अनेक मूर्तीपैकी सर्वात प्राचीन मूर्ती समजली जाते. ही मूर्ती एका लाकडी पेटीत ठेवली होती. या पेटीवर आणि तिच्या भेगांत साठलेल्या सेंद्रिय गाळावर अमेरिकेतील बर्कली येथील कॅलिफोर्निया विश्वविद्यालयाच्या प्रयोगशाळेत ‘कार्बन डेटींग’ प्रक्रिया करून तिचे वयोमान शोधण्यात आले असता, ही मूर्ती २८ सहस्र ४५० वर्ष प्राचीन असल्याचे आढळून आले. म्हणजेच ही मूर्ती कलियुगातील (सध्या कलियुगाचे ) ५ सहस्र १२२ वे वर्ष चालू आहे) नसून ती द्वापारयुगातील असल्याचे निदर्शनास आले आहे.

याविषयीची माहिती प्रसिद्ध पुरातत्व तज्ञ के. के. महंमद यांनी ट्वीट करून दिली आहे. ‘२८ सहस्र ४५० वर्षांपूर्वी इजिप्त, ग्रीस, मेसोपोटेमिया, मोहेंजोदारो-हडप्पा संस्कृतीही अस्तित्वात नव्हती, असे महंमद यांनी यात म्हटले आहे. के. के. महंमद हे श्रीरामजन्मभूमी उत्खनन करणाच्या पथकात सहभागी होते. ‘ही भूमी श्रीरामाचीच जन्मभूमी आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने ठरवण्यात के. के. महंमद यांनी दिलेल्या अहवालाचा मोठा वाटा होता.