अबब ! जमिनीच्या व्यवहारात लाखोंची फसवणूक..

0
569

तळेगाव दाभाडे, दि. २९ (पीसीबी) – एकाला विकलेली जमीन कल्पना न देता दुसऱ्याला विकली. यामध्ये पहिल्या व्यक्तीकडून 52 लाख 25 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. हा प्रकार 22 मार्च 2018 ते 26 मार्च 2021 या कालावधीत मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथे घडला.
धनंजय काशीपाटील कलाटे (वय 37, रा. डांगे चौक, वाकड) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिताराम गणा आगळे, किरण सिताराम आगळे, प्रियंका किरण आगळे, चंद्रकांत शेलार, मंदा चंद्रकांत शेलार, मच्छिंद्र विजय कोल्लम (सर्व रा. दारुंब्रे, ता. मावळ) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दारुंब्रे येथील गट नंबर 26 मधील 24 आर जमिनीचे साठेखत आणि 22 मार्च 2018 रोजी कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र फिर्यादी यांच्या नावे करून दिले. त्यापोटी फिर्यादी यांच्याकडून 52 लाख 25 हजार रूपये आरोपींनी स्वीकारले. या जमिनीबाबत देवीसिंग चितोडीया या व्यक्ती सोबत व्यवहार झाल्याचे आरोपींनी फिर्यादीस त्यांना कल्पना दिली नाही. तसेच 26 मार्च 2021 रोजी वडगाव मावळ दुय्यम निबंधक कार्यालयात आरोपीने देवीसिंग पन्नीसिंग चितोडिया (रा. दारुंब्रे, ता. मावळ) यांना खरेदीखत करून दिले. या प्रकरणात आरोपींनी फिर्यादी यांची 52 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.