अबब ! कोरोनामुळे ३ हजार ८९३ कोटींचा तोटा; ४८ वर्षांत त्या कंपनीचा पहिल्यांदाच झाला लॉस

0
600

प्रतिनिधी,दि.१५ (पीसीबी) : कोरोना वायरसमुळे फायद्यात असलेल्या जगभरातील अनेक कंपन्या तोट्यात जाऊ लागल्या. कोरोनाचा सर्वात जास्त फटका विमान कंपन्याना बसला आहे. सिंगापूर एअरलाईन्स या आशिया खंडातली नावाजलेली विमान कंपनीने ४८ वर्षात पहिल्यांदाच तोटा झाला असल्याचे जाहीर केले आहे. २०२० च्या पहिल्या तिमाहीत सिंगापूर एअरलाईन्स कंपनीचा तब्बल ३ हजार ८९३ कोटींचा तोटा झाला असल्याचे समोर आले आहे. एप्रिल व मे महिन्यात कोरोनाची तीव्रता अधिक वाढल्याने याकाळात विमान कंपन्यांचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. लॉकडाऊनमध्ये झालेल्या तोटयामुळे अनेक विमान कंपन्या दिवाळखोर होण्याची शक्यता तज्ञांच्या वतीने वर्तवली जात आहे.

जानेवारी महिन्यात चायना येथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यानंतर सुमारे २१३ देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला. त्यामुळे बहुसंख्य देशांनी लॉकडाऊन घोषित केला व आंतरराष्ट्रीय आणि अंतरदेशी विमान सेवा बंद केल्या. सिंगापूर एअरलाईन्स यांची केवळ अंतरराष्ट्रीय विमान सेवा असल्याने लॉकडाऊनचा मोठा फटका त्यांना बसला आहे. चायना मध्ये जानेवारीपासूनच विमानसेवा बंद केल्याने सिंगापूर एअरलाईन्सच्या उत्पन्नात मोठी घट झाली. सिंगापूर एअरलाईन्सच्या वतीने ५ खंडातील ३२ देशांमधील ६२ शहरांमध्ये १३७ विमानांच्या सहाय्याने सेवा पुरविली जाते. सन २०१८ – २०१९ मध्ये सिंगापूर एअरलाईन्सचा एकूण महसूल ६१ हजार १६५ कोटी रुपये इतका होता. परंतु जानेवारी ते मार्च २०२० च्या तिमाहीत सिंगापूर एअरलाईन्सचा तब्बल ३ हजार ८९३ कोटींचा तोटा झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सन २०१९ – २०२० या आर्थिक वर्षात सिंगापूर एअरलाईन्सला १ हजार १२६ कोटी रुपयांचा तोटा सोसावा लागला आहे. मागील ४८ वर्षात पहिल्यांदाच या विमान कंपनीचा तोटा झाला आहे. या तोटयाच्या अनुशंघाने व लॉकडाऊनमुळे त्यांनी पगार कपातीचा निर्णय घेतला व त्याचा परिणाम १० हजार कर्मचाऱ्यांच्या पगारावर झाला आहे.

अमेरिकेसह, भारत, युरोपीयन देश, रशिया व आखाती देशांसह सुमारे २१३ देशांमध्ये एप्रिल व मे महिन्यात कोरोनाची तीव्रता अधिक वाढल्याने याकाळात विमान कंपन्यांचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. या कालावधीत तर विमान कंपन्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे विमान कामगार कपात लॉकडाऊनमध्ये झालेल्या तोटयामुळे अनेक विमान कंपन्या दिवाळखोर होण्याची शक्यता तज्ञांच्या वतीने वर्तवली जात आहे.