Pune

अबब, एकाच दिवसात नऊ रुग्ण, रूपीनगर ठरला हाॅट स्पाॅट

By PCB Author

April 28, 2020

पिंपरी, दि.२८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मंगळवारी सकाळी (दि. २८) आणखी नऊ रूग्णांचा करोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. यामुळे करोना बाधितांच्या संख्येने शतक पार केले असून बाधितांची एकूण संख्या १०५ वर गेली आहे. सलग दोन दिवस मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने शहराचा रुपीनगर परिसर हा हाॅट स्पाॅट ठरला आहे.

सोमवारी शहरामध्ये ११ रुग्णांचा करोना बाधित असल्याचा अहवाल महापालिकेस प्राप्त झाला. तर १७१ जणांचे नमुने तपासणीकरता प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यापैकी नऊ जण करोना बाधित असल्याचे असल्याचा अहवाल मंगळवारी सकाळी प्राप्त झाला.

नऊपैकी आठ जण हे रुपीनगर परिसरातील आहेत. तर एक रुग्ण खडकीमध्ये राहण्यास असून सध्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेत आहे. रूपीनगरमधील सहा पुरुष व दोन महिलांना करोनाची लागण झाली आहे.

शहरात सध्या ६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघेजण महापालिकेच्या हद्दीबाहेरील तर एक रुग्ण पुणे जिल्ह्याच्या हद्दीबाहेरील आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या नऊ रुग्णांवर पुण्यामधील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.