Maharashtra

‘अबकी बार उद्धव सरकार’; मुख्यमंत्री शिवसेनेचाच

By PCB Author

February 18, 2019

मुंबई, दि.१८ (पीसीबी) – अखेर नाही नाही म्हणत शिवसेना युतीसाठी तयार झाली आहे. आज संध्याकाळी शिवसेना आणि भाजपच्या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे. तर अबकी बार उद्धव ठाकरे सरकार, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीचा फॉर्म्युला ठरला आहे, अशी  माहिती त्यांनी यावेळी दिली. आज संध्याकाली ६ वाजता भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर बैठकीसाठी येणार आहेत. यावेळी युतीबाबतची अधिकृत घोषणा होईल, असेही त्यांनी सांगितले.

अमित शहा आज संध्याकाळी ‘मातोश्री’वर येणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. यानंतर दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. युतीचे जे काही फॉर्म्युले आहेत, त्याबाबत सर्व दोन्ही प्रमुख नेते घोषणा करतील, असे राऊत यांनी सांगितले.