अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांना मोठा दिलासा आता यापुढे ..

0
376

पुणे, दि. १९ (पीसीबी) – इमारतीमध्ये कमी क्षेत्रफळ असलेल्या सदनिकाधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांना सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता यापुढे क्षेत्रफळानुसार मेंटेनन्स द्यावा लागणार आहे. फ्लॅटच्या क्षेत्रफळानुसारच मेंटेनन्स भरावा लागणार आहे, तसा मोठा निर्णय सहकार न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे कमी क्षेत्रफळ असलेल्या सदनिकाधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यापुढे अपार्टमेंटमध्ये सदनिकांच्या क्षेत्रफळानुसार मेंटेनन्स आकारला जाणार आहे. त्यामुळे सरसकट मेंटेन्स द्यावा लागणार नाही. सदनिकांचे क्षेत्र जास्त असणाऱ्यांना याचा लाभ मिळत होता. मात्र, कमी क्षेत्रफळ असणाऱ्यांना जास्तीचा मेंटेनन्स द्यावा लागत होता. याविरोधात एका फ्लॅटधारकांने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर सहकार न्यायालयाने हा महत्त्वाचा निकाल दिला आहे.
या निकालामुळे अपार्टमेंटमधील कमी क्षेत्रफळ असलेल्या सदनिकाधारकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र हा निकाल फक्त अपार्टमेंटशी संबंधित असून, सोसायट्यांच्या देखभाल शुल्काशी त्याचा कोणताही संबंध नाही, असे सांगण्यात आले आहे. अपार्टमेंट कायद्यातील कलम-10 प्रमाणे अपार्टमेंटधराकांना मेंटेनन्स हा सदनिकेच्या क्षेत्रपळानुसार आकारण्याचा निर्णय दिला आहे.