अपशकुनी म्हणत विवाहितेचा छळ

0
169

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – तू अपशकुनी आहेस, असे म्हणत विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काळेवाडी येथे घडली.

पती परेश विश्‍वंबर सवाई (वय 34), दिर आकाश सवाई (वय 28), सासरे विश्‍वंबर सवाई (वय 65) आणि दोन महिला आरोपी (सर्व रा. अशोका सोसायटी, काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पिडित विवाहितेने बुधवारी (दि. 22) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 9 मे 2018 ते 22 सप्टेंबर 2021 या कालावधीत काळेवाडी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी विवाहिता हिला तू अपशकूनी आहेस, असे म्हणत तिचा छळ केला. हुंड्याचे राहिलेले एक लाख रुपये व फ्लॅट घेण्यासाठी दहा लाख रुपये माहेराहून आणावेत यासाठी वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करीत तिचा शाररीक व मानसिक छळ केला. पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे याबाबत अधिक तपास करीत आहेत.