Maharashtra

अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधवांच्या घरावर  हल्ला

By PCB Author

October 17, 2019

औरंगाबाद, दि. १७ (पीसीबी) – कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर काही अज्ञातांनी बुधवारी मध्यरात्री हल्ला केला. शहरातील समर्थनगर भागात असलेल्या त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. तसेच काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली.  हा हल्ला शिवसेनेकडून करण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

दुचाकीवरून आलेल्या काही लोकांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.  हर्षवर्धन जाधव हे कन्नड मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी त्यांनी शिवसेनेवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसैनिकांचा रोष वाढला होता. सिल्लोडचे चर्चेत नाही. त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केले असावे, असे सांगण्यात येत आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी विशेष प्रयत्न केले होते.

कन्नड मतदारसंघात शिवसेनेने उदयसिंह राजपूत यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादीकडून संतोष कोल्हे रिंगणात आहेत, तर भाजपचे बंडखोर म्हणून किशोर पवार यांनीही उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदारसंघातील चुरस वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेली भूमिका अनेक शिवसैनिकांना पटलेली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत तो रोष शिवसैनिक व्यक्त करत होते.