महसूल विभागातील ही वरिष्ठ महिला अधिकारी लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकली पण…

0
711

उस्मानाबाद, दि.२८ (पीसीबी) : महसूल विभागातील वरिष्ठ महिला अधिकारी लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकली खरी पण सोबतच पोलिसांनी आणखी एकाला बेड्या ठोकल्या. परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्याकडे वाळूचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी दरमहा हप्तारुपी एक लाख 10 हजार रुपयांची लाच घेताना भूम येथील उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकर यांच्यासह कोतवाल विलास नरसिंग जानकर याला उस्मानाबाद लाचलुचपत विभागाने रांगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी केली असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, महसूल विभागातील एक वरिष्ठ दर्जाचा अधिकारी जाळ्यात अडकल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. Anti Corruption कारवाईमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय तेजीत सुरू असून अधिकारी यांना दरमहा लाखो रुपयांची लाच द्यावी लागते हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांचा एक टीप्पर आणि त्यांच्या पाहुण्यांचा जेसीबी आणि तीन ट्रॅक्टर हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी उपविभागीय अधिकारी मनिषा राशीनकर व विलास जानकर यांनी दरमहा हप्तारुपी लाच मागितली होती.मात्र तक्रारदाराने ते मान्य केले नाही. अखेर तडजोडी अंती ९० हजार आणि २० हजार देण्याचे ठरले त्यानुसार हे पैसे स्वीकारले होते. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते, पोलीस निरीक्षक गौरिशंकर पाबळे, अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके यांनी केली.