Desh

…अन् प्रियंका गांधी यांनी साप पकडला

By PCB Author

May 02, 2019

रायबरेली, दि. २ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधून काढत आहेत. प्रियंका गांधी रायबरेली येथे सोनिया गांधी यांचा प्रचार करताना त्यांनी न घाबरता  साप  पकडला. त्यांनी गारुडी यांच्याकडून सापाबाबतची  माहिती जाणून घेतली. या दरम्यान त्यांनी एक साप हातात देखील घेतला.  याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.

दरम्यान, प्रियंका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशाच्या पूर्वांचल प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी रायबरेली आणि अमेठी मतदारसंघात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा जोरदार  प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. याआधीच्या निवडणुकीत  ही त्यांनी प्रचार केला आहे. मात्र, त्यावेळी त्यांच्याकडे काँग्रेसची अधिकृत अशी कोणती जबाबदारी नव्हती.

दरम्यान, याआधी देखील प्रियंका गांधी यांचे वेगवेगळे रुप पाहायला मिळाले आहे. अमेठीमध्ये त्यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा देखील वेगळा अंदाज  दिसून येत आहे. एका शेतात आग लागल्यानंतर स्मृती इराणी आग विझवण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित लोकांसोबत मदतीसाठी पोहोचल्या होत्या.