Maharashtra

…अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; तृप्ती देसाईंच्या ईशाऱ्यावर मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरेंचा प्रतिइशारा

By PCB Author

February 22, 2020

पुणे, दि.२१ (पीसीबी) –  स्त्री संग समतिथीला केला तर मुलगा आणि विषमतिथीला केला तर मुलगी होते असे वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

तसेच इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करावा या आग्रही मागणीसाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी अहमदनगरमध्ये जाऊन पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले होते. इंदोरीकर महाराज नेहमी कीर्तनातून महिलांचा अपमान करतात असा आरोप त्यांनी केला होता. त्याचसोबत ४ दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास इंदोरीकरांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा दिला होता. मात्र तृप्ती देसाई यांच्या इशाऱ्यावरुन मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यांना प्रतिइशारा दिला होता.

मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी इंदोरीकर महाराजांचा महिलांवरील जुना व्हिडिओ व्हायरल करुन तृप्ती देसाईंवर पुन्हा निशाणा साधला आहे. या व्हिडिओत महाराज म्हणतात की, १ हजार मुलांमध्ये ९३५ मुली असा जन्मदर आहे. ६५ मुली हजाराला कमी आहे, याला एकमेव कारण सोनोग्राफी आहे, मुलगी व्हायलाच पाहिजे, जगातील सर्वात मोठं पाप स्त्रीभ्रूण हत्या आहे. काही महिला मुलगी झाल्यावर तोंड पाडतात पण का? ,’ असे इंदोरीकर महाराज या व्हिडिओत सागंत आहेत.

हा व्हिडीओ पहा.अजून काय हवे आणि अशा लोकांना वर गुन्हे दाखल करा म्हणतात श्रुपणखा वृत्तीडोके ठिकाणावर नसते ना श्रुपणखा विकृती बाकी काही नाही

Gepostet von Rupali Patil Thombare am Freitag, 21. Februar 2020