अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पोटच्या अपंग मुलाची हत्या करणाऱ्या आईला दहा वर्षांची सक्त मजूरीची शिक्षा

0
1507

पुणे, दि. २ (पीसीबी) – अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पोटच्या अपंग मुलाच्या डोक्यात बॅट घालून त्याची हत्या केल्याच्या आरोपीखाली आईला दहा वर्षे सक्‍त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

राखी तरूण बालपांडे (वय ४१ ) असे आरोपी महिलेचे नाव असून चैतन्य तरूण बालपांडे (वय  १३,  रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे मृत मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी राखी यांनी त्यांच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या स्वत:च्या १३ वर्षाच्या मुलाच्या डोक्या बॅट मारुन त्याची हत्या केली होती. पोलिसांनी तातडीने या गुन्ह्याचा छडा लावत आरोपी राखी यांना अटक केली. याप्रकरणी आज राखी बालपांडे यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. भयसारे यांनी सदोष मनुष्यवध प्रकरणी दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.