अनेकांनी सज्जनार यांचे ट्विटवरुन अभिनंदन केले आहे.

0
390
व्ही. सी. सज्जनार

हैदराबाद, दि.६ (पीसीबी) –  हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संक्षयित आरोपींना पोलिसांनी ठार केले आहे. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी चौकशीसाठी नेले असता या चारही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये या चौघांना ठार करण्यात आल्याची माहिती तेलंगण पोलिसांनी दिली आहे. सकाळीच आलेल्या या वृत्ताची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा आहे. त्यातही या एन्काउंटरवरमध्ये प्रमुख भूमिका बजावली ती आयपीएस अधिकारी असणाऱ्या व्ही. सी. सज्जनार. ही बातमी समोर आल्यानंतर अनेकांनी सज्जनार यांचे अभिनंदन केले आहे.