अनिल देशमुखांचे ईडी वर ‘हे’ खळबळजनक आरोप; ईडीविरोधात देशमुखांची हायकोर्टात याचिका

0
359

मुंबई, दि.०९ (पीसीबी) : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यामागे मनी लॉड्रिंग आणि भ्रष्टाचार प्रकरणी ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. मात्र आता देशमुखांनी ईडीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असून समन्स रद्द करण्याची मागणी केली आहे. तपासयंत्रणा केवळ खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महत्वाची कागदपत्रं लीक केली जात असल्याचा आरोपही अनिल देशमुखांकडून करण्यात आला आहे. कोर्टाने याप्रकरणी सोमवारपर्यंत निकाल राखीव ठेवला आहे.

अनिल देशमुखांच्या वतीने वकील विक्रम चौधरी युक्तिवाद करत असून अमन लेखी यांच्यासह एसजी तुषार मेहता, एएसजी अमन लेखी आणि एएसजी अनिल सिंह अशी वकिलांची तगडी फौज ईडीची बाजू मांडत आहेत. अनिल देशमुखांना तातडीने दिलासा देण्याची गरज असल्याचं असल्याचं देशमुखांच्या वतीने सांगण्यात आलं असून तपास यंत्रणेच्या चौकशीची गरज काय? याची माहिती देत नाहीये, तपासयंत्रणेनं अद्याप ECIR ची कॉपी दिलेली नाही. या प्रकरणानं तपासयंत्रणा केवळ माध्यमांद्वारे खळबळ निर्माण करू पाहतंय, असा आरोपही केला आहे.

तर अनिल देशमुखांच्या याचिकेच्या वैधतेवरच सरकारी पक्षाचा आक्षेप आहे. अशाप्रकारे ही याचिका एकलपीठापुढे मांडली जाऊ शकत नाही, या याचिकेवर खंडपीठापुढे सुनावणी व्हायला हवी, असा युक्तिवाद सॉलिसटर जनरल तुषार मेहता यांनी केला आहे. दरम्यान प्रकरण प्रलंबित असताना, ते अवाजवी खळबळ निर्माण करत आहेत, नियमांचे उल्लंघन करत आहेत आणि निवडक कागदपत्रं आणि माहिती लीक करत आहेत असा आरोप अनिल देशमुखांकडून करण्यात आला आहे.