अनिर्णित सामने आता आठवणीच्या कप्प्यात

0
178

पुणे, दि. 2 (पीसीबी) : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम दोन संघांच्या शर्यतीत ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड अशा दोन संघांत चांगलीच चुरस आहे. या तीन संघांच्या मालिका सुरू आहेत. या मालिकेतील न्यूझीलंडचा पाकिस्तानविरुद्ध एकच सामना बाकी आहे, तर ऑस्ट्रेलिया-भारत यांच्या दरम्यान अजून दोन सामने होणार आहेत. सध्या ऑस्ट्रेलिया आघाडीवर असून, भारताचे स्थान दुसरे, तर न्यूझीलंडचे तिसरे आहे. भारताला दोन्ही सामने अनिर्णित राखले तरी चालणार आहे. पण, न्यूझीलंड जिंकल्यास त्यांचा मार्ग कठिण होणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अलिकडच्या काळात अनिर्णित सामने हे आठवणीच्या कप्प्यातच राहिले आहेत.

सहाजिकच भारताने दोन्ही सामने जिंकल्यास आणि न्यूझीलंडही जिंकल्यास ऑस्ट्रेलियाचा मार्ग कठिण होऊ शकतो. अलिकडच्या काळातील सामन्यांचे निकाल पाहिले, तर सामने निर्णायक होणार असेच आकडेवारी सांगत आहे. एक काळ असा होता की कसोटी सामने हे रटाळ आणि कंटाळवाणे म्हणून दुर्लक्षित जाऊ लागले होते. सामने निकाली होण्याची वाट बघावी लागत होती. झटपट क्रिकेटचा वाढत चाललेला प्रभाव आणि त्याची लोकप्रियता लक्षात घेता त्याचा परिणाम कसोटी क्रिकेटवर देखील होऊ लागला. परिणामी कसोटी सामने निर्णायक होऊ लागले. विशेष म्हणजे पाच दिवसाचे सामने अभावानेच पाच दिवस चालतात. अडीच, तीन, चार अशा कितीही दिवसात हे सामने निकाली ठरत आहेत.

गेल्या पाच वर्षातील आकडेवारीवर नजर टाकली, तर हे लगेच लक्षात येईल. गेल्या पाच वर्षात ४९२ सामने झाले असून, यात तब्बल ४२२ सामने निकाली ठरले आणि केवळ ७० सामने अनिर्णित राहिले. यात सर्वाधिक ११ अनिर्णित सामने इंग्लंडचे राहिले आहेत. पाच वर्षात सर्वाधिक ३६ विजय भारताचे असून, सर्वाधिक ३० पराभव देखिल इंग्लंडचे आहेत.

असे झाले सामने

२०१५ – ८६ सामने ३४ विजय ३४ पराभव १८ अनिर्णित
२०१६ – ९४ सामने ४० विजय ४० पराभव १४ अनिर्णित
२०१७ – ९४ सामने ४० विजय ४० पराभव १४ अनिर्णित
२०१८ – ९६ सामने ४३ विजय ४३ पराभव १० अनिर्णित
२०१९ – ७८ सामने ३५ विजय ३५ पराभव ८ अनिर्णित