अनधिकृत बांधकामाची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेनी मागितली एकाकडे दहा लाखांची खंडणी

0
417

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – अनधिकृत बांधकामाची महापालिकेकडे केलेली तक्रार मागे घेण्यासाठी एका महिलेने एकाकडे दहा लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. तर या महिलेचे पैसे देऊन विषय संपवून टाक, नाहीतर तुझे काही खरे नाही, अशी धमकी एका अज्ञातांने दिली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.१४) पिंपरी येथे घडला आहे.

या प्रकरणी गिरीश सुरेश सचदेव (वय ३५, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संगीता शहा आणि एका अज्ञातांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता शहा हिने गिरीश सचदेव यांना फोन  करून तुमच्या अनधिकृत बांधकामाबाबत मी महापालिकेकडे तक्रार दाखल केली आहे.  ही तक्रार मागे घेण्यासाठी मला दहा लाख रूपये दे, तरच मी तक्रार मागे घेईन, अशी धमकी दिली. तर एक अनोळखी व्यक्ती फिर्यादी गिरीश सचदेव यांच्या दुकानात जाऊन तू संगीता शहा यांचे पैसे देऊन विषय संपवून टाक. नाही तर तुझे काही खरे नाही, अशी धमकी दिली.

या प्रकरणाचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहे.