अधिवेशनात अमित ठाकरे यांनी प्रथमच राजकीय ठराव मांडला

0
281

मुंबई, २३ (पीसीबी) – महाअधिवेशनाच्या निमित्ताने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी ठराव मांडून अमित ठाकरें जोरदार लाँचिंग केले.

आजच्या अधिवेशनात अमित ठाकरे यांनी प्रथमच राजकीय ठराव मांडला. यावेळी राज ठाकरे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. अमित ठाकरे हे व्यासपीठावर बोलण्यासाठी आले तेंव्हा त्यांच्या मातोश्री भावूक झाल्याच्या पाहायला मिळाल्या.अमित ठाकरे यांनी पहिला ठराव हा शिक्षणाचा मांडला. परवडणाऱ्या आणि हक्काचे शिक्षण सर्वांना मिळावे, लहान मुलांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याची अंमलबजावणी व्हावी, राज्यात क्रीडा विद्यापीठ व्हावे आदी ठराव अमित ठाकरे यांनी मांडले.