अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक: विधानभवनाच्या पायऱ्यावर ठिय्या

0
629

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला आज (सोमवार) पासून सुरुवात होत आहे. दरम्यान, आरक्षण आणि दुष्काळाच्या मुद्द्यावर पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मराठा, धनगर आणि मुस्लीम समाजाला आरक्षण  देण्याची त्यांनी यावेळी मागणी केली.

मराठा, मुस्लीम, धनगर समाजाला आरक्षण आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी  आदी मागण्यासह दुष्काळाची केवळ घोषणा न करता शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, यासाठी विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विरोधी पक्षांनी ठिय्या मांडला.

यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर शोकप्रस्ताव मांडला.