फोरसाईटच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनमध्ये " अति मोबाइल वापरण्याचे दुष्परिणाम " या विषयांवर दिला सामाजिक संदेश

Pune

“अति मोबाइल वापरण्याचे दुष्परिणाम” या विषयांवर दिला सामाजिक संदेश

By PCB Author

January 11, 2020

पुणे , दि.११ (पीसीबी) – फोरसाईट स्कुल अण्ड ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकतेच डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे अतिशय उत्साहात व जल्लोषात पार पडले .

स्नेहसंमेलनात मोबाईलचे दुष्पपरिणाम विविधेतून एकता , अंधश्रद्धा यासारख्या सामाजिक प्रश्नावर समाज प्रबोधन केले. त्याच प्रमाणे समूह नृत्य , पथनाट्य , मूकनाट्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. संस्थेचे सचिव शैलेश मेहता , संचालिका निशा मेहता यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.  पारितोषिक वितरण नगरसेविका मंगला मंत्री , राजेश सांकला यांच्याहस्ते करून विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. मान्यवरांचे स्वागत डॉ एम डी लॉरेन्स यांनी केले , सूत्रसंचालन अर्चना म्हस्के यांनी केले आभार शिल्पा खाडे यांनी केले .

यावेळी नगरसेविका मंगला मंत्री , राजेश सांकला , डॉ आशिष तापडिया , पालक विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

फोरसाईटच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनमध्ये” अति मोबाइल वापरण्याचे दुष्परिणाम ” या विषयांवरदिला सामाजिक संदेश