“अति मोबाइल वापरण्याचे दुष्परिणाम” या विषयांवर दिला सामाजिक संदेश

0
520
फोरसाईटच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनमध्ये " अति मोबाइल वापरण्याचे दुष्परिणाम " या विषयांवर दिला सामाजिक संदेश

पुणे, दि.११ (पीसीबी) – फोरसाईट स्कुल अण्ड ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकतेच डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे अतिशय उत्साहात व जल्लोषात पार पडले .

स्नेहसंमेलनात मोबाईलचे दुष्पपरिणाम विविधेतून एकता , अंधश्रद्धा यासारख्या सामाजिक प्रश्नावर समाज प्रबोधन केले. त्याच प्रमाणे समूह नृत्य, पथनाट्य, मूकनाट्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. संस्थेचे सचिव शैलेश मेहता, संचालिका निशा मेहता यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पारितोषिक वितरण नगरसेविका मंगला मंत्री, राजेश सांकला यांच्याहस्ते करून विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. मान्यवरांचे स्वागत डॉ एम डी लॉरेन्स यांनी केले, सूत्रसंचालन अर्चना म्हस्के यांनी केले आभार शिल्पा खाडे यांनी केले .

यावेळी नगरसेविका मंगला मंत्री , राजेश सांकला , डॉ आशिष तापडिया , पालक विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

फोरसाईटच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनमध्ये
” अति मोबाइल वापरण्याचे दुष्परिणाम ” या विषयांवर
दिला सामाजिक संदेश