अतिशय साधा-सरळ मुलगा माझ्यासाठी नवरा म्हणून हवा- सोनाक्षी सिन्हा

0
547

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – चित्रपटांमध्ये व्यग्र असली, तरी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मध्यंतरी तिच्या लग्नाच्या अफवेने वैतागली होती. ती लग्न करणार असल्याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात सुरू होती. तिला सातत्याने त्याबद्दल प्रश्नही विचारले जात होते. सोनाक्षीने नुकतेच त्यावर भाष्य केले. ती म्हणाली, ‘ही चर्चा सुरूच आहे, तर मला एवढे सांगायला नक्की आवडेल, की माझ्या पालकांना अतिशय साधा-सरळ मुलगा माझ्यासाठी नवरा म्हणून हवा आहे.

मात्र, बॉलिवूडमध्ये असा मुलगा मिळणे कठीण आहे. मी एका सेलिब्रेटीला डेट केले आहे आणि त्याबद्दल कुणालाच काही माहिती नाही. माझ्या बॉयफ्रेंडने कधी माझी फसवणूक केलीच, तर पुढचा दिवस पाहण्यासाठी तो या जगात नसेल, असे मी खात्रीने सांगू शकते.’ सोनाक्षी सध्या शिल्पी दासगुप्ता दिग्दर्शित ‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.