अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर मारहाण प्रकरण; नगरसेवक रविंद्र धंगेकर यांना एक दिवसाची पोलीस कोठडी

530

पुणे, दि. १५ (पीसीबी) – पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणुन कार्यरत असलेले राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात जलपर्णीच्या निविदेवरून सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान उत्तर देण्यासाठी आलेल्या अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर यांच्यासह १५ ते १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अऱविंद शिंदे यांनी अटकपुर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांना न्यायालयाने तात्पुरता अटकपुर्व जामीन मंजुर केला. रविंद्र धंगेकर यांनीही याप्रकरणी अटकपुर्व जामीनासाठी अर्ज न्यायालयात दाखल केला. मात्र त्यांचा जामिन अर्ज गुरुवारी न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे धंगेकर हे आज (शुक्रवार) सकाळी स्पत: पोलिसांसमोर हजर झाले. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.