Notifications

अण्णा हजारेंचे आंदोलन सुरू; गिरीश महाजनांची भेट नाकारली

By PCB Author

January 30, 2019

अहमदनगर, दि. ३० (पीसीबी) – लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  राळेगणसिद्धी  येथे आजपासून (बुधवार)  आंदोलन करत आहेत. अण्णा हजारे यांनी यादवबाबचे दर्शन घेऊन उपोषणाला सुरुवात केली.