Maharashtra

अण्णा हजारेंची प्रकृती खालावली; रूग्णालयात दाखल

By PCB Author

February 14, 2019

अहमदनगर, दि. १४ (पीसीबी) – विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सात दिवस केलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचा  अशक्तपणा वाढला असून    डॉ. सय्यद आणि डॉ. धनंजय पोटे यांच्या सल्ल्यानुसार त्यांना तपासणीसाठी नगरला हलवण्यात आल्याचे माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. 

युनिटी हॉस्पिटलचे डॉ. सुहास घुले यांनी अण्णांवर नुकत्याच महत्त्वाच्या तपासण्या पूर्ण केल्या  आहेत. सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. परंतू जास्त थकवा जाणवत असल्यामुळे डॉक्टरांनी  पुढील दोन दिवस आणखी काही तपासण्या (पॅथॉलॉजिकल) व काही उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये थांबवून घेतल्याचे अण्णांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

सध्या नोबल हॉस्पिटलमध्ये डॉ. बंदिष्टी आणि डॉ. कांडेकर यांच्या  नियंत्रणाखालीत्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अण्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत काहीही चिंता नाही, असे  डॉक्टरांनी सांगितले आहे.