अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने पटकाविला ‘कर्मवीर करंडक’

0
477

>> डॉ.आंबेडकर महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धा संपन्न

औंध, दि. १२ (पीसीबी) – रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, मराठी विभाग व विद्यार्थी मंच आयोजित, ‘कर्मवीर करंडक पथनाट्य स्पर्धे’मध्ये हडपसरच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने बाजी मारली. त्यांनी ‘पराभव महापुरुषांच्या विचारांचा’ या विषयावर उत्कृष्ट सादरीकरण करून प्रेक्षकांची व परीक्षकांनी मने जिंकली. तर द्वितीय क्रमांक डॉ.डी.वाय. पाटील कला,विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी(वाहतूक नियम व नागरिक), तृतीय क्रमांक राजमाता जिजाऊ कॉलेज ऑफ फार्मसी देढुळगाव(एक छोटी दिवटी) यांनी पटकविला.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सप्ताहाच्या अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जीच्यामध्ये विद्यापीठातील तब्बल ४० महाविद्यालयाच्या संघांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला.

स्पर्धेचे उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, मा.रूपालीताई चाकणकर व रयत शिक्षण संस्थेचे, लेखापरीक्षक, मा.शिवलिंग मेनकुदळे यांच्या हस्ते पार पडले. त्यासाठी प्राचार्य अरुण आंधळे, प्राचार्य संजय नगरकर, डॉ.बी.एस पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी ऋषीकेश कानवटे आदी उपस्थित होते.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचा समारोप बक्षीस वितरण समारंभाने झाला. त्यासाठी उपप्राचार्य रमेश रणदिवे, डॉ.सविता पाटील आदी उपस्थित होते. सदर स्पर्धेचे प्रा.धनंंजय भिसे, प्रा.किरण गाडवे, प्रा.वैशाली देठे यांनी परिक्षण केले.

उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन, प्रा.सायली गोसावी यांनी तर बक्षिस वितरण समारंभाचे दिव्या जोशी हिने केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रविराज काळे, सूर्यकांत सरवदे, ओमकार भोईर, गौरी राजीवडे, प्रेरणा कांबळे, आदित्य रणपिसे, अजय चव्हाण, अभिजित कदम, अजय थेरोडकर, कोमल जावीर, हर्षद बनसोडे, पूजा साबळे,अपर्णा साठे,धिरज भालेराव,अनिकेत पारवे, किशोर भिगले, वैष्णवी बालवडकर,रेश्मा गोरखे, छाया बोयावार, निलोफर शेख, सिद्धी घट्टे, श्रुती उबाळे, वसुधा रसाळ, रेणुका गोरखे, योगिता तळवार, रुपाली काळी, प्रकाश घोडके आदींनी परिश्रम घेतले.