Pimpri

अण्णाभाऊ साठे यांचे निवास्थान अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान: आमदार महेश लांडगे

By PCB Author

August 02, 2020

– जन्मशताब्धीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांचे मूळगाव वाटेगावला भेट

पिंपरी, दि. 2 (पीसीबी)  ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव…’असा संदेश देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मूळगावातील निवासस्थान हे अवघ्या महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान आहे, अशा भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्धीनिमित्त भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या मूळगावी वाटेगाव येथे रविवारी भेट दिली. यावेळी नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्यासह भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव हे अण्णाभाऊ साठे यांचे गाव आहे. याठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे निवासस्थान आणि जीवनपट उलघडणारे शिल्पचित्रही आहे.

आमदार लांडगे म्हणाले की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्य त्यांच्या मूळगावी वाटेगाव या ठिकाणी जाऊन त्यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. तसेच, राहत्या घरी जाऊन अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनप्रवासावर आधारित तैलचित्र व शिल्पसृष्टी पाहिल्याने आम्हांस संघर्षातून लढण्याची प्रेरणा मिळाली.