अटल बिहारी वाजपेयींच्या पुतळा अनावरणावरुन राजकारण! भाजपचा आरोप तर शिवसेनेचंही प्रत्युत्तर….

0
351

मुंबई , दि. २४ (पीसीबी) : देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. या निमित्तानं देशभरात त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं जात आहे. मात्र मुंबईत अटल बिहारी वाजपेयींच्या जयंती निमित्ती मुंबईत त्यांच्या एका पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज करण्यात येणार होते. मात्र, यावरुन आता राजकारण होताना दिसून येत आहे. कारण भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्य सरकारवर आरोप केलेत.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कांदिवली येथे वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम नियोजित होता. परंतु राज्य सरकारने पुतळा कार्यक्रमासाठी परवानगी दिली नाही असा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे आजचा पूर्णाकृती पुतळा उभारणीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबईत येणार होते परंतु काल राज्य सरकारने ऐनवेळी परवानगी नाकारली त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला असा भाजपने दावा केला आहे.
गोपाळ शेट्टी यांनी म्हटलं आहे की, अटलजी यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला भलेही सरकारनं परवानगी दिली नाही मात्र बाकीचे कार्यक्रम आम्ही करणार आहोत. 25 ते 30 डिसेंबरपर्यंत अटल महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला विरोध नाही. कायद्याच्या चौकटीत हे प्रकरण कुठे अडकलंय का हे पहावं लागेल. याची लवकरच माहिती घेऊ, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.