अटकेच्या भीतीपोटी पी. चिदंबरम घरातून फरार

0
410

दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्य आहे. अटकेच्या भीतीपोटी ते दिल्ली येथील घरातून फरार झाले आहेत.

मंगळवारी सीबीआयची टीम चिदंबरम यांना बेड्या ठोकण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेली होती. मात्र ते घरात आढळले नाहीत. दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारत चिदंबरम यांना मोठा झटका दिल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची टांगती तलवार आहे. दिल्ली हायकोर्टाने अंतरिम जामीन देण्यास नकार दिल्यानंतर पी. चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. आयएनएक्स मीडियाला परकीय गुंतवणूक प्रमोशन मंडळाकडून बेकायदेशीर पद्धतीने परवानगी मिळवून देण्यासाठी ३०५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर आहे. ईडी आणि सीबीआय सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मात्र आपण निर्दोष असून भाजप सरकार विनाकारण आपल्याला दशकभर जुन्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा चिदंबरम यांनी केला आहे.