अज्ञात व्हॉट्सअॅप नंबर वरुन महिलेला पाठवले अश्लील मेसेज; गुन्हा दाखल

1082

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – अज्ञात व्हॉट्सअॅप नंबर वरुन एका ३२ वर्षीय विवाहित महिलेला अश्लील व्हिडीओ आणि मेसेज पाठवून त्यांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.१२) सकाळी साडेअकरा ते दोनच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, अज्ञात मोबाईल नंबर धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका ३२ वर्षीय विवाहित महिलेला त्यांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर ९३७०९६९३५६ या क्रमांकावरुन अज्ञात इसमाने सोमवारी सकाळी साडेअकरा ते दोनच्या दरम्यान अश्लील व्हिडीओ आणि मेसेज पाठवून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी या मोबाईल नंबर धारकाविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) नांदुरकर तपास करत आहेत.