Pune Gramin

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

By PCB Author

November 30, 2020

चाकण, दि. ३० (पीसीबी) – भरधाव वेगात जाणा-या एका वाहनाने रस्त्याने जाणा-या महिलेला धडक दिली. यात महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 28) रात्री सव्वानऊ वाजता नाशिक-पुणे रोडवर कुरुळी चाकण येथे झाला.

अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. याबाबत विशाल रमेश राक्षे (वय 29, रा. राक्षेवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावर कुरुळी चाकण येथे पिराच्या मंदिरासमोर शनिवारी एका अज्ञात वाहनाने रात्री सव्वानऊ वाजता रस्त्याने जाणा-या महिलेला जोरदार धडक दिली. त्यात महिला गंभीर जखमी झाली आणि त्यातच त्या महिलेचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता तसेच पोलिसांना माहिती न देता अज्ञात वाहन चालक पळून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.