अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

0
786

हिंजवडी, दि. ११ (पीसीबी) – भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 6 मे रोजी मारूंजी रोडवर, हिंजवडी येथे घडली. याबाबत 10 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय काशिनाथ कांबळे (वय 40) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा सावत्र भाऊ विशाल काशिनाथ कांबळे (वय 35, रा. सुतारवाडी, पाषण) यांनी सोमवारी (दि. 10) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी विशाल यांचा सावत्र भाऊ संजय हा 6 मे रोजी हिंजवडी येथील मारूंजी रोडने चालला होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने संजय यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या संजय यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच घटनेची माहिती पोलिसांना न देता पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.