Pimpri

अज्ञात वाहनाच्या धडकेत झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

By PCB Author

September 06, 2021

तळेगाव दाभाडे, दि. ६ (पीसीबी) – डिलिव्हरी देण्यासाठी जात असलेल्या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 4) रात्री तळेगाव दाभाडे येथील सेंट माउंट चर्चसमोर घडली.

विश्वनाथ बाबू जमादार (वय 33) असे मृत्यू झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. याबाबत अशोक प्रेमनाथ घोसले (वय 38, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी रविवारी (दि. 5) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाऊजी मयत विश्वनाथ हे झोमॅटो कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करत होते. शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास चाकण – वडगाव रोडने डिलिव्हरी देण्यासाठी दुचाकीवरून जात होते. ते सेंट माउंट चर्चसमोर आले असता एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने विश्वनाथ यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच घटनेची माहिती न देता पळून गेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.