अज्ञातांनी मेडिकलची फोडलेच पण शिवाय……

0
206

मोशी, दि. १४ (पीसीबी) – शिवाजीवाडी मोशी येथे असलेले रिलॅक्स मेडिको केमिस्ट अँड ड्रगिस्ट नावाचे मेडिकल अज्ञात चोरट्यांनी फोडले. मेडिकलमधून 28 हजार 750 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 13) पहाटे साडेपाच वाजता उघडकीस आली.

नारायण घीसाराम चौधरी (वय 22, रा. शिवाजीवाडी, मोशी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे शिवाजीवाडी मधील चौधरी मार्केट शेजारी रिलॅक्स मेडिको केमिस्ट अँड ड्रगिस्ट नावाचे मेडिकल दुकान आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास चौधरी यांनी त्यांचे मेडिकल दुकान कुलूप लावून बंद केले. त्यानंतर रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी मेडिकल दरवाजाचे लाॅक आणि कोयंडा तोडून आत प्रवेश केला. मेडिकल दुकानातून लॅपटॉप, मोबाईल, घड्याळ, रोख रक्कम तसेच रेनकोट असा एकूण 28 हजार 750 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.