अजित पवार ६ मार्चला अर्थसंकल्प मांडणार

0
316

मुंबई, दि.११ (पीसीबी) – महाराष्ट्र विधिमंडळाचे आर्थिक वर्ष २०२०- २१ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार (ता.२४) पासून सुरू होणार आहे. अशी माहिती परब यांनी दिली.

राज्यातले महाविकासआघाडी सरकार येत्या ६ मार्चला अर्थसंकल्प मांडणार आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २४ तारखेला सुरु होऊन २० मार्चला संपेल. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट इथे एका शिक्षिकेला जाळून मारल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातला महिला सुरक्षिततेच्या प्रश्नावरही या अधिवेशनात चर्चा होणार आहे. राज्यातल्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करणारे विधेयकही सरकार या अधिवेशनात मांडेल जाणार आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाचे आर्थिक वर्ष २०२० – २१ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार (ता.२४) पासून सुरू होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली. विधान भवनात विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली.

या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व संबंधित अधिकारी उपस्थित होते.