Pimpri

अजित पवार यांच्याकडून बाबर कुटुंबियांचे सांत्वन…

By PCB Author

February 04, 2022

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दुपारी दिवंगत माजी खासदार गजानन बाबर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. वाकड येथील बाबर यांच्या निवासस्थानी अजित पवार सुमारे अर्धा तास होते. गजानन लोकसेवा सहकारी बँकेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला होता, त्याचे उद्धाटन पवार यांनीच केले होते.

त्यावेळच्या काही आठवणी अजित पवार यांनी बोलून दाखविल्या. वाई येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्यावर १८ वर्षे उपाध्यक्ष म्हणून बाबर यांनी केलेले काम कोणीही विसरू शकत नाही, असे पवार म्हणाले. यावेळी मधुकर बाबर, प्रकाश बाबर, योगेश बाबर, धीरज बाबर, सुरज बाबर, अमित बाबत, सुमित बाबर यांच्यासह शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे, उद्योजक दिलीप देशमुख उपस्थित होते.