अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार म्हणतात…सुशांतसिंह आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी

0
251

मुंबई, दि. २७ (पीसीबी) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ यांनी केली.

“सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची भावना आहे. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती केली, की राष्ट्रीय भावना विचारात घेऊन सीबीआय चौकशी सुरु करावी” असे ट्वीट पार्थ पवारांनी भेटीनंतर केले. या ट्वीटमध्ये पार्थ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मेन्शन केले आहे.