अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात – चंद्रकांत पाटील

0
358

कोल्हापूर,दि.२७(पीसीबी) – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “अजित पवार हे मुख्यमंत्री असल्यासारखं वागत आहेत” अशी टीका केली आहे. पुन्हा एकदा तीन चाकाचं सरकार पडेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फिरताहेत फॉरेनला. आणि अजित पवार हे मुख्यमंत्री असल्यासारखं वागत आहेत. तेच रोज कोणतीही घोषणा करतायेत. एकवेळ मुख्यमंत्र्यांना राग नक्की येईल आणि म्हणतील मी मुख्यमंत्री आहे माझं काय आहे की नाही, हे सरकार पाडण्यासाठी आम्हाला बाहेरुन काहीही करण्याची गरज नाही. या वजनानेच हे सरकार पडेल, असंही पाटील म्हणाले आहेत.

कोरेगाव भीमा प्रकरणी केंद्राच्या समितीला जर सहकार्य केलं नाही तर कायदेशीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा चंद्रकांत पाटील म्हाणाले आहेत. एल्गार प्रकरणावरुन चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.