अजित पवार झाले होम क्वारंटाइन; कोरोनाची लक्षण दिसत असल्याने स्वतःच घेतला निर्णय

0
218

मुंबई,दि.२२(पीसीबी) : महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे कोरोनाच्या परिस्थितीत सर्वात जास्त काळजी घेताना दिसले. मात्र आता त्यांनाच कोरोनाची लक्षणं दिसतं असल्यामुळे त्यांनी स्वतःच क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपासून त्यांना कोरोनाची लक्षणं जाणवत असल्याने त्यांनी लगेचंच कोरोनाची तपासणी करुन घेतली. ती निगेटीव्ह आली आहे. मात्र त्यांना थोडा सर्दी ताप असल्याने त्यांनी होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. कारण मागील काही दिवसांमध्ये ते इतर राजकीय नेत्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे कोरोना पासून काळजी घेत त्यांनी स्वतःच क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता त्यांनी पुढील काही दिवसांचे कार्यक्रम आणि कामकाज हे सध्या रद्द केलं आहे.