Maharashtra

अजित पवार आणि शरद पवारांमुळे धन्याचा धनंजय झाला…धनंजयचा धनुभाऊ झाला – धनंजय मुंडे

By PCB Author

January 20, 2020

पुणे,दि.२०(पीसीबी) – मला २०१४ ला गद्दार, घरफोड्या, पाठीत खंजीर खुपसणारा, खलनायक असे म्हणायचे. मात्र जसंजसं काम होत गेलं तसं धनंजयचा धनुभाऊ झाला असं वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये आभार मेळाव्यात बोलत होते.

पाच वर्षांपूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांनी माझ्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली नसती, तर कदाचित हा भाऊ तुम्हाला लक्षात पण आला नसता, दिसलाही नसता. माझ्यातील जे कर्तृत्व आहे ते सुद्धा पहायला मिळालं नसतं असे भावनिक उद्गार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी काढले आहेत.

“आज मी जे काही आहे ते शरद पवार आणि अजित पवारांमुळे आहे. पाच वर्षात काम केली, नाही तर २०१४ ला मला गद्दार, घरफोड्या, पाठीत खंजीर खुपसणारा, धन्या, खलनायक असं म्हणायचे. मात्र, जसंजसं काम होत गेलं तस धन्याचा धनंजय झाला. धनंजयचा धनुभाऊ झाला आणि आता…..असं म्हणताच शिट्या सुरू झाल्या…शेवटी काही जरी झालं तरी नियती इमानदारीच्या पाठीमागे असते. सात वर्षात खूप काही सहन केलं पण कधी दुःख व्यक्त केलं नाही. नाराजी व्यक्त केली नाही. समाजसेवेचा वसा जो हाती घेतला आहे तो स्वर्गीय मुंडे साहेबांमुळे, अण्णांमुळे…तो कधीच सोडला नाही,” असंही धनंजय मुंडे म्हणाले.