Maharashtra

अजित पवार आणि गिरीश महाजनांमध्ये जुंपली ‘मुतऱ्या तोंडाचा अजित’ आशयाचे नाशिकमध्ये बॅनर  

By PCB Author

August 07, 2019

नाशिक, दि. ७ (पीसीबी) – अजित पवार यांनी गिरीश महाजनांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी नाशिकमधील राष्ट्रवादी भवना बाहेर ‘मुतऱ्या तोंडाचा अजित….’ अश्या आशयाचे बॅनर्स लावल्याचे पहायला मिळाले.

नाशिकमधल्या राष्ट्रवादी भवनाच्या बाहेरच भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी अजित पवारांना देशद्रोही म्हणत त्यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत जहरी टीका केली. यावेळी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. दरम्यान, अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना ‘नाच्या’ असे संबोधले होते. यावरून आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार वाद पेटला आहे.