अजित पवारांना तात्काळ पदावरुन हटवा – शालिनी पाटील

0
385

सातारा,दि.८(पीसीबी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत, तरीदेखील ते आता सत्तेवर आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ पदावरून हटवलं पाहिजे, अशी मागणी माजी आमदार शालिनी पाटील यांनी राज्यपालांकडे केली आहे.

शिखर बँक घोटाळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार हे प्रमुख आरोपी आहेत. शिखर बँकेच्या घोटाळ्याचा गांभीर्याने विचार करता अजित पवार यांना सत्तेवर राहण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळे त्यांना पदावरुन हटवलं पाहिजे, असे शालिनी पाटील म्हणाल्या आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शालिनी पाटील यांनी भेट घेत ही मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात एक निवेदन राज्यपालांना दिलं आहे.