Maharashtra

अजित पवारांच्या झेंड्याचा दांडा आमच्या हातात – रावसाहेब दानवे

By PCB Author

August 27, 2019

जालना, दि. २७ (पीसीबी) – अजित पवार यांच्याजवळ आता कोणताच झेंडा शिल्लक राहिलेला नाही. त्यांच्या झेंड्याचा दांडाच आमच्या हातात आला आहे. त्यांच्या जवळचे लोक भगव्या झेंड्याकडे आले आहेत. आम्ही खूप दिवसांपासून त्यांना भगव्याबद्दल सांगत होतो. पण ऐकत नव्हते. आता लोकांनीच भगवा कसा असतो ते दाखवून दिले,  अशा शब्दांत भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी हल्ला चढवला.

भाजपवाले राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षात घेऊन निवडणुका लढवणार आणि उद्याच्या मंत्रिमंडळात त्यांनाच घेणार असल्याने राज्यात राष्ट्रवादीचीच सत्ता असेल,  या राष्ट्रवादीच्या खासदार  सुप्रिया सुळे यांच्या विधानाचाही दानवे यांनी समाचार घेतला.

दानवे म्हणाले की, विधानपरिषदेचे विद्यमान विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे पूर्वी भाजपमध्ये होते आणि सध्या राष्ट्रवादीच्या यात्रेचे नेतृत्व करणारे अमोल कोल्हे पूर्वी शिवसेनेत होते, हे ताईंनी लक्षात घ्यावे. दरम्यान, भाजप-शिवसेना  यांचा जागावाटपाचा फार्म्युला ठरलेला आहे. तिकिटे जाहीर झाली की सगळ्यांना कळेल, असे ते म्हणाले.