Maharashtra

अजित पवारसह जयंत पाटलांचा विधानसभेला पराभव करणार; चंद्रकांत पाटलांचा निर्धार  

By PCB Author

June 26, 2019

सांगली, दि. २६ (पीसीबी) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचादेखील वाळवा विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार पराभव करणार, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत  पाटील यांनी आज (बुधवार)  सांगली येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला माढा, कोल्हापूर आणि हातकणंगले हे लोकसभा मतदारसंघ युतीने उद्ध्वस्त केले आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकीत पवारांच्या बालेकिल्ल्याची निशाणीही ठेवणार नाही. तसेच वाळवा विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील यांचा देखील  भाजप निश्चित पराभव करेल, असा निर्धार त्यांनी  व्यक्त केला.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आमचे टार्गेट असले, तरी ते प्रॅक्टिकल असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा पराभव करणे हेच आमचे मुख्य टार्गेट असेल, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना केले होते.