Maharashtra

अजितदादा, बारामतीत येतोय; गिरीश महाजनांचे प्रतिआव्हान

By PCB Author

February 10, 2019

जळगाव , दि. १० (पीसीबी) – अजितदादा पवार यांनी मला बारामतीत येण्याची आव्हान दिले होते. ते म्हणत आहेत, तर माझेही त्यांना सांगणे आहे,  आपण येतो आहे, असे प्रतिआव्हान  राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज (रविवार) येथे दिले.

जळगाव येथील  भाजपच्या नियोजित कार्यालयाच्या मैदानावर  आयोजित कार्यक्रमात  महाजन बोलत होते.

गिरीश महाजन म्हणाले की,  आपल्याला आता  अनिल गोटे धुळ्यातून लढण्याचे आव्हान देत आहेत. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील पाचोऱ्यातून लढण्याचे आव्हान देत आहेत. आपण एकटे कुठे कुठे लढणार. गेल्या काही दिवसांपूर्वी बारामती पालिका निवडणूकीत संघटनेच्या माध्यमातून लढणार असे बोललो होतो.

त्यावर  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्याला बारामतीत या, असे आव्हान दिले होते. त्यामुळे   त्यांना म्हणाव मी आता येतोच. कारण आता पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत. सिंकदरलाही परत जावे लागले होते. ही हिंदुस्थानी जनता आहे, असे महाजन म्हणाले.