अजिंक्य रहाणेनं राजस्थान रॉयल्सची साथ सोडली,९ वर्षांनंतर घेतला संघ बदलण्याचा निर्णय

0
700

मुंबई, दि.१४ (पीसीबी)-आयपीएलचा १३वा हंगाम सुरू होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना डिसेंबरमध्ये IPL २०२० साठी लिलाव होणार आहे. दरम्यान त्याआधी आयपीएलच्या लिलावासाठी ऑफ सीझन ट्रेड विंडो ही १४ नोव्हेंबरपर्यंत खुली राहणार आहे. त्यामुळं  तत्पूर्वी सहभागी संघ खेळाडूंची अदलाबदल करत आहेत.

दरम्यान, भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे गेली ९ वर्ष रहाणे आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत होता. मात्र या संघानं रहाणेला रीलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आयपीएल 2020मध्ये रहाणे आता आयपीएलमध्ये दिल्लीकर होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे.

रहाणे २०११ पासून राजस्थान संघासोबत आहे. २०१८ मध्ये रहाणे या संघाचा कर्णधार झाला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तुलनेत रहाणेचा आयपीएलमधला रेकॉर्ड जास्त चांगला आहे. रहाणेनं आयपीएलमध्ये १२२ च्या स्ट्राईक रेटनं ९ हजार ८२० धावा केल्या आहेत.