“अजान हा इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग असू शकतो पण लाऊडस्पीकरवरुन अजान देणं हा धर्माचा अविभाज्य भाग असू शकत नाही”: अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल

0
347

नवी दिल्ली, दि.२२ (पीसीबी) : इस्लामच्या कोणत्याही कायद्यात मशिदींवरील भोंग्यांवरून अजान आणि नमाज अदा करण्याचा उल्लेख नाही. तसेच शरीयतमध्येही त्याचा उल्लेख नाही. १४०० वर्षांचा इस्लामला इतिहास आहे. या धर्मातील पवित्र कुराणमध्ये अजान तोंडी करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मुस्लिम धर्मीयांना कुराण आणि आयतमध्ये प्रार्थने संदर्भात काही मापदंड घालून दिले आहेत. पण या कुराण आणि आयातमध्ये यांत्रिक उद्घोषणेला कोणतेही स्थान नाही. केवळ सामाजिक बदल होत गेल्याने मशिदीवर भोंगे आले आहेत. पण या भोंग्यांमुळे इतर धर्मियांना का त्रास द्यावा?

या विषयाला जावेद अख्तर यांनी काही महिन्यांपूर्वी वाचा फोडली होती. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले होते की, “भारतात जवळपास ५० वर्षापूर्वी लाऊडस्पीकरवरील अजान देणे हराम मानले गेले. मात्र ती पद्धत अजूनही संपलेली नाही. ही पद्धत संपली पाहीजे. आशा आहे की, इतरांना जो त्रास होतोय, तो पाहता लाऊडस्पीकरवरील अजान आता बंद झाली पाहीजे.”

मित्रांनो, हाच मुख्य फरक आहे कट्टरतावादी विचारधारेत आणि विवेकी विचारधारेत. यावरून लक्षात येते की, कोणताही कट्टरतावाद हा समाजाला विनाशाकडे नेतो आणि माणसाला हैवान बनवितो, तर विवेकी विचारधारा हैवानालाही माणूस बनविते. तेव्हा मशिदीवरील भोंगे काढून ध्वनी प्रदूषणाला आळा घालत मुस्लिम समाज आता अजानसाठी भोंग्यांचा वापर करणार नाहीत अशी अपेक्षा आहे.